लॉकर सुविधा
दृष्टीक्षेप
आपल्याला घरात प्रमाणापेक्षा अधिक दागिने आणि मौल्यवान वस्तू साठवून ठेवणे कधी-कधी सुरक्षेच्या दृष्टीने घातक आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात अडथळा ठरू शकते. या अडथळ्यावर मात करण्यासाठी आता संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था तुमच्या मदतीला आली आहे. तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तू, दागिने,कागदपत्रे ठेवण्यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह अशी जागा संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेने उपलब्ध करून दिली आहे.
सुविधेची वैशिष्ट्ये
- आपल्याकडील अत्याधुनिक लॉकरस ही सेफ डिपॉझिट व्हॉल्ट, अद्ययावत बर्गलर आणि अलार्म सिस्टीमसह पूर्णपणे सुसज्ज आणि वातानुकूलित आहेत.
- अतिरिक्त सुरक्षिततेसाठी लॉकर धारकाला एक कोड दिला जातो, ज्यामुळे सुरक्षा आणखी वाढते.
- ही लॉकर्स तुमच्या गरजेनुसार वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत.
- ही लॉकर्स तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसाठीही घेऊ शकता.