व्यावसायिक कर्ज

कोणताहीव्यवसाय उभारणे आणि तो चालवणे यासाठी गुंतवणूक आवश्यक असते. मात्र, अनेकदा एखादा व्यवसाय सुरू करण्याचे किंवा असलेल्या सध्याच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे आपले स्वप्न पैशांच्या कमतरतेमुळे अधुरे राहते. असे होऊ नये, यासाठी आता संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थाही तुम्हाला व्यावसायिक कर्ज देते. याद्वारे संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था तुम्हाला तुमच्या योजना प्रत्यक्षात आणण्यात मदत करू शकते. व्यवसाय कर्ज हे नवा व्यवसाय किंवा चालू व्यवसायातील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जाते. हे व्यवसाय कर्ज घेण्याचे असंख्य फायदे आहेत; ही कर्ज तुमची आर्थिक अडचण दूर करू शकतात.

  • वैशिष्ट्ये
  • व्याज दर
  • कागदपत्रे

लहान व्यवसाय कर्ज तुम्हाला अनपेक्षित खर्चाच्या संकटापासून ते नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्यापर्यंत मदत करतात. मोठ्या प्रमाणावर विस्तारित प्रकल्पांना निधी देण्यासह विविध गरजा पूर्ण करण्यासाठीहीया कर्जांचा उपयोग होऊ शकतो. यात वेगवेगळे कर्ज पर्याय आहेत; परंतु त्या सर्वांचा उद्देश एकच आहे... तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात तुम्हाला मदत करणे !

  • कर्जासाठीचा अर्ज
  • फोटो
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • व्यवसायाची मालकी असल्याचा पुरावा
  • इतर आर्थिक कागदपत्रे्रे
  • तीन वर्षांचे प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र व फॉर्म १६
  • बॅलन्स शीटसह प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र
  • तारणासाठी मालमत्ता कागदपत्रे
  • दोन जामीनदार व त्यांची कागदपत्रे्रे